Talegaon Dabhade : ऋषिपंचमी निमित्त सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था व श्री गणेश तरुण मंडळ मानाचा पाचवा गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने ऋषिपंचमी निमित्त सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण हा कार्यक्रम कासाबाई भेगडे सभागृह येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात 1 हजार 250 महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यंदा नववे वर्ष आहे.

भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली .या नंतर11आवर्तने अथर्वशीर्षाची झाली.

या नंतर प्रास्तविकामध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पारगे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल तसेच विविध योजनांची माहिती दिली.तसेच नगरसेवक संतोष भेगडे यांनी सर्व उपस्थितांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात पतसंस्थेच्या वेब साईटचे उदघाटन भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या माजी व्यवस्थापिका मुग्धा जोर्वेकर व संस्थेच्या ग्राहक अश्विनी गोखले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.डिजिटल भारताच्या संकल्पनेतून संस्थेने एक डिजिटलायझेशनच्या दृष्टीने एक दमदार पाऊल संस्थेने टाकले आहे.असे प्रतिपादन सौ जोर्वेकर यांनी केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींनी  आपला सहभाग नोंदविला यामध्ये नगरसेवक व आधारस्तंभ संतोष भेगडे  सौ मंगल भेगडे, संध्या देसाई, सौ नूतन भेगडे सौ मेधा भेगडे सौ मनीषा पारगे सौ प्रियांका भेगडे तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महिला उपस्थित  होत्या.

कार्यक्रमात प्रत्येक महिलेस पतसंस्थेकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

ह्या  प्रसंगी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष निलेश राक्षे खजिनदार कौस्तुभ भेगडे, शरद भोंगाडे, समीर भेगडे,राकेश खळदे, अनिल पवार, अमित भसे, वैभव भेगडे, सल्लागार डॉ शाळीग्राम भंडारी व श्री गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल फाकटकर, प्रतीक मेहता, केदार मेढी, पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया केसकर यांनी केले आभार संस्थेचे सचिव अतुल राऊत यांनी मानले.पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वी करणे करिता परिश्रम घेतले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.