Pune News : जुन्या दरानेच गुंठेवारी करण्याची शिफारस

एमपीसी न्यूज – गुंठेवारी योजनेतून घरे नियमित करण्यासाठी मागील आर्थिक वर्षीप्रमाणेच शुल्क आकारण्यात यावे अशी शिफारस स्थायी समितीने राज्य सरकारला केली आहे.

रासने म्हणाले, सध्या महापालिकेत गुंठेवारी प्रकरणे दाखल करून घेण्यात येत आहेत. परंतु या योजनेसाठी आकारण्यात येणारे शुल्क जास्त असल्याने नागरिकांकडून त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या योजनेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या आणि पुढील आर्थिक वर्षांत शासनाने मागील कालावधीप्रमाणेच दर निश्चितीकरावी अशी शिफारस स्थायी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.