Hinjawadi News : कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणा-या महिलेचा पाठलाग करून विनयभंग

एमपीसी न्यूज – कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणा-या महिलेचा पाच वर्षांपासून पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याबाबत 53 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ऑक्टोबर 2015 पासून 13 फेब्रुवारी 2021 या कालावधीत हिंजवडी परिसरात घडला.

भूपेंद्र आनंदराव चव्हाण (वय 53, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सन 2015 मध्ये कोलते पाटील स्टार गेज कन्स्ट्रक्शन कंपनीत सेल्स विभागात काम करत होत्या. त्यावेळी बांधकाम साईटवर फ्लॅटच्या चौकशीसाठी आरोपी भूपेंद्र आला. त्यावेळी त्याची फिर्यादी महिलेसोबत तोंडओळख झाली. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2015 रोजी महिलेला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘तुम्हारे जैसी लड़की अपुनने आक्खा लाइफ में नहीं देखा. जिसको देखके मन का वोल्यूम ऑटोमेटिक बजने लगे. जैसे समझो की, जन्नत की परी आसमान में उड़कर दिल के एयरपोर्ट में लैंड करती है’ असा मेसेज केला.

सन 2017 मध्ये पुराणिक अभितांते या कन्स्ट्रक्शन कंपनीत महिला सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीस लागली. 14 फेब्रुवारी 2018 रोजी आरोपी पुराणिक अभितांते कंपनीच्या साईटवर गाणे म्हणत आला.

14 फेब्रुवारी 2020 रोजी महिला काम करत असलेल्या मेगा पॉलीस कन्स्ट्रक्शन साईटवर आरोपी लाल गुलाबाचे फुल घेऊन आला. साईटवरील सहका-याने आरोपी भूपेंद्र याला साईटवरून काढून दिले. 23 मे 2020 रोजी आरोपीने त्याच्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलवर पीडित महिलेचा फोटो अपलोड केला.

12 फेब्रुवारी रोजी 2021 रोजी बावधन येथे महिलेला डोळा मारला. याबाबत भूपेंद्रच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.