Talegaon Dabhade : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नागरिक मंच तळेगाव दाभाडे, नगरसेवक निखिल भगत, डाॅ. नेहा कुलकर्णी (योगिराज क्लिनिक) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त तळेगाव नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 128 जणांनी सहभाग घेतला. मधुमेहाशी संबंधित विविध तपासण्या आणि मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त (दि.18 नोव्हें.) ताई आपटे प्रतिष्ठान हाॅलमधे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 128 नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराला तळेगाव नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांची रक्तातील साखर तपासून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या सर्व नागरिकांना बी व डी व्हिटॅमिनच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या.

कोविड संसर्गानंतर मधुमेहाचा धोका वाढतो. निखिल भगत यांनी भविष्यात अशा विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. तसेच डाॅ.नेहा कुलकर्णी यांनी नागरिकांची तपासणी करून समुपदेशन केले.

निरंजन जहागीरदार व त्यांच्या सहकार्यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले आणि नागरिक मंचातर्फे असे विविध उपक्रम राबवणार असल्याचेही जहागिरदार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.