Hinjawadi : गाडी काढली नाही म्हणून रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – गाडी काढण्यास सांगूनही (Hinjawadi) गाडी काढली नाही म्हणून चौघांनी एकाला स्टीलचा रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.29) हिंजवडी फेज दोनमध्ये घडला आहे.

अजिंक्य रमेश खडतरे (वय 30 रा. हिंजवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी अजित सदाशिव होके (वय 25 रा.निगडी) व प्रशांत प्रताप कदम (वय 25) व त्यांचे दोन साथीदार यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी फेज दोन येथील इराणी चहाच्या दुकानासमोर त्यांची चारचाकी गाडी पार्क करून थांबले होते. यावेळी अजित याने गाडी काढण्यास सांगितले, फिर्यादी त्याला काढतो म्हणाले असता त्याने आत्ता लगेच काढा असे सांगितले. फिर्य़ादीनी त्यावर नाही काढत जा, मी तुझ्या हॉटेल समोर गाडी लावली नाही, असे उत्तर दिले असता आरोपीने प्रशांत व इतर दोन साथीदारांना बोलावून फिर्यादी यांना लाकडी दांडके व स्टीलच्या रॉडने मारून जखमी केले. यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली (Hinjawadi) असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Instagram Crime : इनस्टाग्रामवरून महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.