Hinjawadi : हिंजवडीत गांजा विक्री करणा-याला एकाला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री करणा-या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 13 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (वय 38, रा. बावधन, मुळगाव नरसिंगपुरा, ता. मारवाड, जि. पाली, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजन गोविंद महाडिक (वय 52) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील पाटील नगर येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी रचून प्रेमसिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला 13 हजार 500 रुपयांचा ओलसर गांजा जप्त केला. त्याने हा गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.