Hinjawadi Crime News : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक 

दोन्ही अपत्ये मुली असल्याच्या कारणावरून करत होता छळ

एमपीसी न्यूज – पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. दोन्ही अपत्ये मुली असल्याच्या कारणावरून तो पत्नीचा छळ करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. नारायण नगर, हिंजवडी याठिकाणी हा प्रकार घडला. 

योगेंद्र मिनबहादूर साही (वय 24, रा. हिंजवडी, मुळगाव – नेपाळ ) असं अटक पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईनं हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील तीन वर्षांपासून ते 18 मार्च 2021 पर्यंत दोन्ही अपत्ये मुली असल्याच्या कारणावरून तो पत्नीचा छळ करत होता. शारिरीक व मानसिक जाचाला कंटाळून महिलेनं गुरुवारी (दि. 18) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.