Chikhali Crime News: गुन्हा दाखल केल्याच्या रागातून पतीची पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – मुलाने स्विफ्ट गाडी घेतल्याने आणि पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून पतीने मुलाला, पत्नीला मारहाण केली. घराच्या हॉलच्या, बेडरुमच्या काचा, जाळी तोडली. ही घटना शुक्रवारी (दि.27) नेवाळेवस्ती, चिखली येथे घडली.

याप्रकरणी पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती शंकर चिमनराव नेवाळे (वय 37, रा. नेवाळेवस्ती, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी नात्याने पती-पत्नी आहेत. पती वेळोवेळी मानसिक, शारिरीक त्रास देत असल्याने पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या फिर्यादी पत्नी व आरोपी पती एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी यांना नातेवाईकांच्या लग्नाला जायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचा मुलाला स्वीफ्ट गाडी आणण्यासाठी सांगितली. मुलाने स्वीफ्ट गाडी घेतल्याने आणि पूर्वीच्या गुन्ह्याच्या राग धरुन आरोपीने मुलाला हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या घराच्या हॉलच्या, बेडरुमच्या काचा, जाळी तोडली. तसेच तुळशी रुंदावन उचकटून आरोपीने फिर्यादीच्या दिशेन दगड फेकून मारला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.