Wakad Crime News: खोटे अहवाल दाखल करण्याची धमकी देत उकळली खंडणी

एमपीसी न्यूज – इमारतींच्या बांधकामात त्रुटी असून प्राप्तीकर चुकवत असल्याचे सांगत सरकारी कार्यालयात खोटे अहवाल दाखल करुन अडचणीत आणण्याची धमकी देत 9.25 कोटींची खंडणी मागितली. धमकी देऊन 2 कोटी रुपयांचा धनादेश घेतल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार 7 डिसेंबर 2020 ते 27 मे 2022 दरम्यान डांगे चौक थेरगाव येथे घडला.

याप्रकरणी केतुल भागचंद सोनिगरा (वय 41, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदिनाथ बी कुचनुर (रा. डांगे चौक, थेरगाव) याला अटक केली आहे.

आरोपी आदिनाश याची आर.ई.कन्सलटन्सी आहे. फिर्यादी सोनिगरा यांच्या डांगे चौक येथे चालु असलेल्या सिग्नेचर पार्क या नवीन इमारतींच्या बांधकामामध्ये खूप त्रुटी असून प्राप्तीकर चुकवत आहे, इत्यादी कारणामुळे फिर्यादीस मोठे नुकसान होऊ शकते असे आरोपी म्हणाला, तसेच फिर्यादी सोनिगरा यांच्याविरोधात सरकारी कार्यालय, नॅशनल ग्रीन ट्रिब्रुनकडे खोटे अहवाल दाखल करुन अडचणीत आणण्याची धमकी सुद्धा दिली.

त्याच्या बदल्यात आरोपीने जबरदस्तीने त्याचीच कन्सल्टंसी सल्ला घेण्याचे व 9.25 कोटी रुपयांची खंडणी मागितली. 2 कोटी रुपयांचा धनादेशही घेतल्याचे फिर्यादीत म्हटले असून वाकड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.