Pune News : पतीने मोबाईल आणि गॅस सिलेंडर चोरले, पत्नीची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज : पती-पत्नीच्या भांडणात कधी काय होईल याचा नेम नसतो. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनमध्ये पती-पत्नीच्या भांडणाचा असाच एक प्रकार समोर आलाय. पती विरोधात पत्नीने तक्रार दिली असून त्याने मोबाईल आणि आणि जास्त सिलेंडर चोरल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॅम्प मधील आर्मी क्वार्टर मध्ये ही घटना घडली. 

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की यातील पती हा रिक्षा चालक आहे. लॉकडाऊन काळात त्याचा व्यवसाय फारसा चालला नाही. दरम्यान या काळात तो घरीच असल्याने पती-पत्नी सारखे वाद व्हायचे. यातून ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले.

दरम्यान पाच नोव्हेंबर रोजी पती दुपारी दीड वाजता पत्नी राहत असलेल्या घरात खिडकीवाटे आला. आणि त्याने घरातील दोन मोबाईल आणि गॅस सिलेंडर सुरू मिळाल्याचा आरोप पत्नीने लावला आहे. पत्नीने दिलेल्या या तक्रारीनंतर लष्कर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनमीत राऊत करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.