Pune News : पुण्यात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात ओढून बलात्कार, शेजाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घराजवळ राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीने दहा वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने घरात ओढत नेहून तिच्यावर बलात्कार केला. 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. 1 फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडित मुलीला जवळच्या दुकानातून पत्त्याचा कॅट करण्यास सांगितले. त्यानुसार मुलगी दुकानात गेली आणि कॅट घेऊन आरोपीला देण्यासाठी त्याच्या घरी गेली.

कॅट देत असताना आरोपीने जबरदस्तीने या मुलीचा हात धरून तिला घरात ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.