Independence Day : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने काढली शहरामध्ये पोलीस रॅली

एमपीसी न्यूज  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज (दि. 14 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड (Independence Day) पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरामध्ये पोलीस रॅली काढण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील 500 ते 600 पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

आज सकाळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. या कार्यक्रमात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्त, सहसहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक असे सुमारे 50 ते 60 अधिकारी तसेच, 350 ते 400 पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तसेच, 50 ते 60 दुचाकी आणि 15 ते 20 चारचाकी पोलीस वाहने या रॅलीमध्ये सहभागी होते.

Talegaon Dabhade – शाह विद्यालयात शानदार पदप्रदान समारंभ संपन्न

यामध्ये पायी सहभागी झालेले आणि दुचाकीवरून सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांनी (Independence Day) तिरंगा घेऊन सहभाग घेतला होता.  ही रॅली बिजलीनगर रेल्ये उड्डाणंपुलावरून पुणे – मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौक येथे पोहोचल्यानंतर महामार्गवरून निगडीमधील भक्ती शक्ती चौक येथे पोहोचल्यानंतर रॅली निगडी येथील पोलीस मुख्यालयापाशी पोहोचली. तेथे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.