India Corona Update : देशात 69,897 ॲक्टिव्ह रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेटही एक टक्क्यांहून कमी

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोनाचा विळखा सैल होत आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणा-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली आहे. सध्या देशात 69,897 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तसेच, पॉझिटिव्हिटी रेट देखील 0.69 टक्के एवढा खाली आला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 396 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 51 हजार 556 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 23 लाख 67 हजार 070 रूग्ण बरे झाले आहेत. चोवीस तासांत 16 हजार 450 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.63 टक्के एवढा झाला आहे. गेल्या 24 तासांत 201 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 14 हजार 589 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77 कोटींहून अधिक प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 178 कोटी 29 लाख 13 हजार 060 जणांना लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.