India Corona Update : 1.08 कोटी रुग्ण कोरोनामुक्त, गेल्या 24 तासात 16,596 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासात नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 16 हजार 596 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासात डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1.08 कोटी रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 96.92 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 15 हजार 388 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 12 लाख 44 हजार 786 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 08 लाख 99 हजार 394 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 27 लाख 16 हजार 796 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 48 हजार 525 चाचण्या सोमवारी (दि. 08) रोजी करण्यात आल्या आहेत.

सध्या देशात 1 लाख 87 हजार 462 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशात 77 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 930 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन 52 दिवस उलटून गेले आहेत. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 26 लाख 85 हजार 598 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.