India Corona Update: देशात 24 तासांत 57,937 जण कोरोनामुक्त तर 55,079 नवे रुग्ण

India Corona Update: 57,937 corona-free and 55,079 new patients in 24 hours देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 27 लाख 02 हजार 743 एवढी झाली असून त्यापैकी सध्या 6 लाख 73 हजार 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासांत बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात सोमवारी 57 हजार 937 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, 55 हजार 079 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 27 लाखांच्या पुढे गेली असून मृतांची संख्या 51 हजार 797 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 27 लाख 02 हजार 743 एवढी झाली असून त्यापैकी सध्या 6 लाख 73 हजार 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 19 लाख 77 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 876 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 51 हजार 797 इतकी झाली आहे.

देशात आजवर 3 कोटी 09 लाख 41 हजार 264 नमूणे तपासण्यात आले आहेत त्यापैकी 8 लाख 99 हजार 864 नमुने हे सोमवारी (दि.17) रोजी तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून काल दिवसभरात 57 हजार 937 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 72 टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूदर 1.94 टक्के आहे. देशातील रुग्ण सकारात्मकतेचा दर हा कमी झाला असून तो 8.8 टक्के एवढा खाली घसरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.