India Corona Update : चोवीस तासांत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज अधिक, 290 मृत्यू

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून, 42 हजार 942 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 30 लाख 58 हजार 843 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 22 लाख 24 हजार 937 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.47 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 3 लाख 92 हजार 864 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 41 हजार 042 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 53 कोटी 31 लाख 89 हजार 348 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 26 हजार 056 नमूने तपासण्यात आले आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 69 कोटी 90 लाख 62 हजार 776 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.