Pune News : शलाकी आयुर्वेदाबरोबर आधुनिक चिकित्सा करतात ही अभिमानाची बाब – डॉ. दिलीप वांगे

एमपीसी न्यूज – सध्याचे शलाकी आयुर्वेदाबरोबर आधुनिक वैद्यकशास्त्राची चिकित्सा उत्तम प्रकारे करतात, ही अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय परिषदेमध्ये लाईव्ह डोळ्याची सर्जरी दाखविण्याची कौतुकास्पद बाब फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते. असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत घेण्यात आलेली परिषद हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे डॉ. दिलीप वांगे यांनी केले.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत वैद्यकीय परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय परिषदेच्या समारोह समारंभाप्रसंगी डॉ. वांगे बोलत होते. ‘सिनर्जी 2022’ या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार, असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे, प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे, डॉ. दिलीप पुराणिक, डॉ. समीर रासकर, डॉ. मंजिरी केसरकर, माजी अध्यक्षा डॉ. संगिता साळवे, डॉ. राधेश्याम झेंडे, डॉ. संदीप निमसे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. वांगे म्हणाले, देशभरात 85 आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत. वर्षाला सुमारे साडेचार हजार विद्यार्थी बाहेर पडतात. नेत्ररोग तज्ञांच्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेमध्ये इंटिग्रेटेड कार्यचिकित्सा किंवा इतर विषयांची इतक्या मोठ्या प्रमाणात परिषद होत नाही. शलाक्य तंत्र हे आयुर्वेद शास्त्रातील नेत्र व कान- नाक-घसा या विषयांचा एक भाग आहे. आधुनिक चिकित्सा, आयुर्वेद चिकित्सा हे शास्त्र आहेत.

हे विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांसाठी आहे. यामध्ये कोणाचीही मक्तेदारी नसते. आपला स्टॅटिस्टिक्स डाटा वैद्यकीय, आरोग्य विभाग, सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. महाराष्ट्रात बीएमएस, एमएस, एमडी डॉक्टर हे प्राथमिक आरोग्य केंद्र, सब सेंटर असेल किंवा आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये आयुर्वेदासोबत आधुनिक वैद्यक शास्त्राची चिकित्सा उत्तम प्रकारे करतात. त्यामुळेच उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की यांचा जो अधिकार त्यानुसार त्यांना आयुर्वेदासोबत आधुनिक चिकित्सा करू द्या, असे म्हटले असल्याचे डॉ. वांगे शेवटी म्हणाले.

डॉ. राजेंद्र लाहोरे म्हणाले, 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या परिषदेत प्रत्येक वर्षी सहभागी होणाऱ्या शलाकींची संख्या वाढत आहे. तसेच आगामी काळात संघटनेसाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्याचे नियोजन आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी संघटनेतील अनेकांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच परिषद यशस्वी झाली.

यावेळी डॉ. दिलीप पुराणिक,डॉ. मंजिरी केसकर, संदीप निमसे, डॉ. संतोष मुंढे, विद्यार्थी स्वप्निल चौधरी, उमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण खाडे आणि डॉ. मयूरेश कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.