Nigdi Crime News : निगडी प्राधिकरण येथे 28 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे एका घराच्या मागील खिडकीचे गज कापून घरात चोरी केली. तब्बल 28 लाख 23 हजारांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आला.

राघवेंद्र दत्तात्रय खेडकर (वय 55, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी (दि. 30) रात्री साडेनऊ ते रविवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अनोळखी चोरट्यांनी घराच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरातून 27 लाख 23 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण 28 लाख 23 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.