Chhatrapati Shivaji Maharaj Swimming Pool : दुर्घटना घडल्याने तलाव बंदच ठेवणे हा उपाय नाही; तलाव पुन्हा सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात (Chhatrapati Shivaji Maharaj Swimming Pool) पोहताना अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा 9 मे रोजी बुडून मृत्यू झाला होता, त्यानंतर हा तलाव सर्वांसाठीच बंद ठेवण्यात आला आहे.

याबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून एखादी दुर्घटना घडली म्हणून जलतरण तलाव बंद ठेवणे हा काही उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक संघासह विलास रासकर, रविंद्र काळे, जितेंद्र निखळ यांनी केली आहे.

Vehicle Robbery : दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यास यश

याबाबत ज्येष्ठ नागरिक संघाने महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्राधिकरणातील जलतरण तलावावर (Chhatrapati Shivaji Maharaj Swimming Pool) अनेक ज्येष्ठ नागरिक पोहण्यासाठी येतात. अनेक जेष्ठ नागरिक गेल्या 15 वर्षांपासून तलावाचे सभासद आहेत. जेष्ठांच्या आरोग्यासाठी पोहणे चांगला व्यायाम आहे. तलावामध्ये एखादी दुर्घटना झाली तर तलाव बंद ठेवणे हा उपाय होऊ शकत नाही.

महापालिकेचे तीनच तलाव सुरू आहेत. त्या ठिकाणी खूपच गर्दी असते. बऱ्याच नागरिकांना पाठीचा मणक्‍याचा त्रास आहे. त्यामुळे डॉक्‍टरने पाण्यात चालणे किंवा पोहणे हा एकमेव उपाय सांगितलेला असतो. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.