Khandala News: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी खंडाळ्यात बांधली लग्नगाठ

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर शनिवारी (दि.19) खंडाळ्यात लग्नगाठ बांधली. अनेक सेलिब्रिटींनी या मोस्ट अवेटेड वेडिंगला हजेरी लावली. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न समारंभ पार पडला.

फरहान अख्तर आणि मॉडेल-अभिनेत्री शिबानी दांडेकर हे मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. ते दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. ते दोघे लग्न करणार आसल्याचे निश्चित झाले होते, मात्र लॉकडाऊनमुळे त्यांच्या लग्नाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर शनिवारी त्यांना ग्रॅन्ड सेलेब्रेशन करत लग्नगाठ बांधली.

दरम्यान, फरहान अख्तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत असतो. फरहानने 2000 मध्ये अधुना भभानीशी लग्न केले होते. फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही आहेत. पण 2017 मध्ये फरहान आणि अधुना वेगळे झाले आणि दोघांचा घटस्फोट झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.