Pimpri Corona Update : रविवारी शहरात 88 नवीन रुग्ण; 184 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 20) दिवसभरात 88 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 184 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 3 लाख 58 हजार 206 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 53 हजार 214 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 1 हजार 105 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 1 हजार 24 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 81 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 6 हजार 661 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 33 लाख 85 हजार 714 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.