Kudalwadi News: रस्ता रुंदीकरणातील पत्राशेडवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने प्रभाग 2 मधील कुदळवाडी परिसरातील रस्तारुंदी करणातील पत्राशेड, चाळीस हजार चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. पत्राशेड भुईसपाट करण्यात आले.अशी  माहिती उपअभियंता प्रवक्ते विजय भोजने 

क क्षेञिय कार्यालय प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी, कुदळवाडी येथे आज (मंगळवारी) महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंञण विभागामार्फत जाधववाडी, कुदळवाडी मधील गट.नं. 688, 680, 30 मीटर डीपी. रस्त्याने बाधित असलेले अनधिकृत बांधकामे ( पत्राशेड) इत्यादीवर निष्काशनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण 12 पत्राशेड, 4 वीट बांधकाम, 2 आर.सी.सी. बांधकाम निष्कासित करण्यात आले. एकूण क्षेञफळ अंदाजे 38,000 चौरस फुट आहे.

सहशहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता, संजय घुबे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, सुर्यकांत मोहिते, उप अभियंता सुधीर मोरे, कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार व इतर 4 कनिष्ठ अभियंता, 12 बिट निरीक्षक, क व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कारवाई दरम्यान 28 पोलीस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पी.एस.आय – 1, पोलीस कर्मचारी – 5, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक – 58 , अग्निशामक दलाचे पथक तैनात होते. वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युतविभागाचे कर्मचारी, मजूर – 25 , जे.सी.बी – 5, पोकलेन – 2, डंपर – 3 गॅस कटर – , 2 क्रेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.