Lonavala News : खंडाळ्यात डस्टर कार जळून खाक

एमपीसी न्यूज – मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा डेड हाऊससमोर आज दुपारी दिडच्या सुमारास पुन्हा एक डस्टर कार जळून खाक झाली.

एक लाल रंगाची डस्टर कार (क्र. MH 04 GJ 0353) लोणावळ्याच्या दिशेने येत असताना गाडीने अचानक पेट घेतला व काही क्षणातच गाडी पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने गाडीला आग लागल्याचे समजताच गाडीमधील असलेल्या पाच जण बाहेर निघाल्याने मोठी जिवितहानी टळली. घटनेची माहिती समजताच आयआरबी अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.