Lonavala News: आडोशी बोगद्याजवळ ऑईलचा टँकर उलटल्याने द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ऑईल टँकर खोपोली-खालापूर दरम्यान आडोशी बोगदा या ठिकाणी उलटला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरु लागली.

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईलचा टँकर उलटून सर्व ऑईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ऑईल टँकर खोपोली-खालापूर दरम्यान आडोशी बोगदा या ठिकाणी उलटला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरु लागली.

_MPC_DIR_MPU_II

याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. खासगी लहान वाहने ही वलवण लोणावळा येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली आहेत. तर मोठी अवजड वाहने थांबविण्यात आली आहे.

फायर ब्रिगेडच्या वाहनांतून रस्त्यावर पाणी मारत रस्ता धुण्याचे तसेच ऑईलवर माती टाकत चिकटपणा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.