Maharashtra Corona Update : रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर, मृत्यूदर 1.82 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) दिवसभरात 675 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 104 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 98.04 टक्के एवढा झाला असून, मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 66 हजार 380 एवढी झाली आहे. त्यापैकी 77 लाख 12 हजार 568 जण बरे झाले आहेत. आज 1,225 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्याच्या घडीला राज्यभरात 6,106 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

राज्यात आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर 1 लाख 43 हजार 706 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. आजवर 7 कोटी 78 लाख 75 हजार 104 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 663 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1,31,412 जण होम क्वारंटाईन आहेत.

ओमायक्रॉन अपडेट –

महाराष्ट्रात आज 104 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजवर राज्यात 4,733 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 4,509 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.