Pune Corona Update : शहरात नवीन 120 कोरोना रुग्णांची नोंद; 199 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज सुद्धा वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 120 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 9 हजार 345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 60 हजार 531 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 066 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 120 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 2 हजार 271 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 44 लाख 90 हजार 450 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख सध्या कमालीचा पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.