Maharashtra Corona Update : दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा; आज राज्यात 809 नवे रुग्ण, केवळ 10 मृत्यू

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या तोंडावर राज्यात कोरोना बाबत मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात आज (सोमवारी) दिवसभरात 809 नवे कोरोना रुग्ण वाढले असून, 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 1 हजार 901 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 11 हजार 887 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 52 हजार 486 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.59 टक्के झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 15 हजारांवर आली असून, सध्या 15 हजार 552 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत‌. राज्यात आजवर 1 लाख 40 हजार 226 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 27 लाख 52 हजार 687 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 933 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 60 हजार 432 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.