Maharashtra Corona Update: राज्यात बुधवारी 23,816 नवे रुग्ण, 325 मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 9 लाख 67 हजार 349 एवढी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 86 हजार 462 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यात बुधवारी (दि.9) दिवसभरात 23 हजार 816 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 325 रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी एकूण 13 हजार 906 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 9 लाख 67 हजार 349 एवढी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 86 हजार 462 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्य आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

राज्यात बुधवारी 13 हजार 906 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 70.96 टक्के एवढा आहे तर, मृत्युदर 2.87 टक्के असून बुधवारी 325 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत 48 लाख 83 हजार 006 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 67 हजार 349 (19.81%) नमुने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 16 लाख 11 हजार 280 होम क्वारंटाइन आहेत तर, 37 हजार 644 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.