Maharashtra Corona Update : राज्यात 60 हजार सक्रिय रुग्ण, दिवसभरात 3,994 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3 हजार 994 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 4 हजार 467 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात दररोज नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या राज्यात 60 हजार 352 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 88 हजार 767 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 17 लाख 78 हजार 722 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 94.17 टक्के एवढा झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात 75 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 48 हजार 574 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 5 लाख 3 हजार 886 जण होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 168 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत जवळपास 1 कोटी 20 लाख नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.