Maharashtra Corona Update : धोक्याची घंटा, राज्यात आज 8,807 नवे रुग्ण, 80 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासाठी हि धोक्याची घंटा आहे. आज दिवसभरात राज्यात 8 हजार 807 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 80 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 21 हजार 119 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बरे झालेल्या 2 हजार 772 बरे झालेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 20 लाख 08 हजार 623 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 94.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 59 हजार 358 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज दिवसभरात राज्यात 80 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 51 हजार 937 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. राज्य सरकारने करोनाची ही वाढ रोखण्यासाठी राज्याच्या अनेक भागात पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यात लॉकडाउन, संचारबंदी सारखे निर्णय घेतले आहेत. पण रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी उलटी वाढतच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.