Maharashtra Corona Update : राज्याचा मृत्यूदर 1.61 टक्के ; आज 601 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना बळींची संख्या 90 हजार 349 एवढी झाली आहे. आज राज्यात (मंगळवारी, दि.25) 601 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. राज्याचा मृत्यूदर 1.61 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात 24 हजार 136 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 26 हजार 155 एवढी झाली आहे. त्यापैकी 52 लाख 18 हजार 768 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून,आज 36 हजार 176 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या राज्यात 3 लाख 14 हजार 368 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यात 601 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 90 हजार 349 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.61 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 92.51 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 41 हजार 565 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 26 लाख 16 हजार 428 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 20 हजार 829 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.