Talegaon Dabhade: इंदोरी येथील कंपनीला भीषण आग, 8 ते 10 कोटींचे नुकसान

major fire in archies factory in indori talegaon dabhade, Loss of Rs 8 to 10 crore

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदोरी येथील अर्चिज इंटरप्राइजेस इंडिया प्रा. लिमिटेड आणि अर्चिज पॅकेजिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीत आज (दि.29) सकाळी 8.30 च्या सुमारास आग लागली. आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन.एस. कार्ले यांनी व्यक्त केला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी कामगार कामावर रुजू झाले होते. कंपनीत एकूण 125 कामगार आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक कामगार आपापल्या गावी गेले आहेत. आग लागली तेव्हा कंपनीत 20 कामगार कामाला आले होते. या दोन्ही कंपन्या पॅकेजिंग मटेरियल निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.

कंपनीचे नवनाथ कार्ले यांनी सांगितले, की सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरक्षेची व्यवस्था चोख असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात कच्चा मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे फायरमन गणेश जावळेकर, रोहित पवार, बाळू ठाकर, बाळू चव्हाण, आकाश ओव्हाळ यांनी आग नियंत्रणात आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like