Mamurdi News: मामुर्डीतील पीएमपीएमएल बस स्टॅण्डचे आरक्षण रद्द

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास योजना आराखड्यानुसार मामुर्डीगावातील सर्व्हे नंबर 35/ 3 जमिनीवर पीएमपीएमएल बस स्टॅण्डचे ठेवलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे. महासभेने आरक्षण रद्द करण्यास उपसूचनेद्वारे मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास योजना आराखड्यानुसार मामुर्डीगाव सर्व्हे नंबर 35/ 3 या जमिनीवर आरक्षण क्रमांक 4/175 ही जागा पीसीएमटी बस स्टॅण्डसाठी राखीव आहे. हे आरक्षण देहूरोड कॅन्टोमेंटच्या 2000 यार्डाच्या हद्दीजवळ आहे.

मामुर्डी गावठाणाचा समावेश देहूरोड कॅन्टोमेंटमध्ये आहे. कॅन्टोमेंटमधून नियोजित बस स्टॉपकडे येणारे रस्ते लहान आहेत. त्यामुळे कॅन्टोमेंटच्या बाजूने बस मार्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आरक्षण क्रमांक 4/175 पीएमटी बस स्टॅण्डसाठी विकास योजनेनुसार ठेवलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.