Pimpri News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केले. याबाबत जानेवारी 2017 मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आनंद हरी पवार असे शिक्षा सूनवलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 13 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत जिल्हा सत्र न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए व्ही रोट्टे यांनी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करीत होत्या.

मुलीचे आई वडील नसल्याने ती तिच्या आजीकडे राहत होती. आरोपी आनंद पवार याचे पीडित मुलीच्या घरी वारंवार जाणे होत असे. तिला घर घेऊन देतो, तुझा सांभाळ करतो, तुझे लग्न लावून देतो असे अमिश दाखवून आरोपी मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असे. त्यातून मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

या गुन्ह्याची शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात 16 मार्च 2021 रोजी अंतिम सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधान 376 (2), बाल लैंगिक अत्याचार कायदा 4, 5 यात अजन्म कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने कारावास. तसेच भारतीय दंड विधान कलम 506 मध्ये दोन वर्षे साधी कैद आणि 5 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. हांडे यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.