Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य

एमपीसी न्यूज : ”आत्ताच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयाची खाज का निर्माण झाली?” असा सवाल करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. तानाजी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी बऱ्याचदा चर्चेत असतात. आता त्यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले, कि या सरकारच्या काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत टोला लगावला आहे.

खडकी बाजार परिसरात दोन सराईत गटात जोरदार वाद; 11 जणांना अटक

उस्मानाबाद येथील कार्यकर्त्या मेळाव्यात (Maratha Reservation) ते बोलत होते. त्यात त्यांनी म्हंटले, कि “भाजप शिवसेनेची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा विषय काढत सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला होता. 2019 च्या नंतर सत्तेत दगाबाजी करत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने केले. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय अक्षरशः बाजूला पडला. जनतेचा कौल 2019 मध्ये लक्षात घेत, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनी एकत्रित येत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. आता हळूच सोशल मीडियावर मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला जातोय. कधी ओबीसी, कधी sc, कधी st असे विविध विषय चर्चेत आणले जात आहेत. यामागील करता करविता कोण? हे तुम्हाला माहीत आहेच. आत्ताच त्यांना आरक्षणाची खाज कशी सुटली? याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.