Minor Molestation Case : अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी समजपत्र देऊन मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे.

विनयभंग (Minor Molestation Case) करणारा मुलगा अल्पवयीन असून याबाबत पीडीत मुलीच्या वडिलांनी ही फिर्याद दिली आहे.

ESIC : शंभर खाटांचे कामगार विमा रुग्णालय उभारण्यास मंजुरी, डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 11 जून ते 18 जुनच्या रात्री 7 च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. आरोपीने गेल्या आठ दिवसांपासून अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याच्या हेतूने मुलीच्या घरी कोणीच नसताना तिच्या घरी जाऊन वारंवार शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. प्रसंगी फोनवरून संपर्क करून कन्नड भाषेतील अश्लील शिव्या दिल्या.

याप्रकरणी आरोपी विरोधात भा. द. वि. कलम 452, 354(ड), 509, 323 व लैंगिक अपराधपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आरोपीचे वय लक्षात घेता पोलिसांनी संबंधित मुलाला समजपत्र देऊन त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.