Crime News : मनसे शहराध्यक्षाचा चाकूने भोसकून खून, राज्याच्या राजकारणात खळबळ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणीचे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर सोमवारी जीवघेणा हल्ला झाला.किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सचिन पाटील यांच्यावर चाकूने वार करण्यात आले.या हल्ल्यात सचिन पाटील यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या प्रकरणी अधिक माहिती, परभणीचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील हे मंगळवारी रात्री काही मित्रांसोबत वसमत रोड परिसरातील मंदिराजवळ रात्री गप्पा मारत बसले होते.यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीसोबत त्यांचे किरकोळ वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर पुढील व्यक्तीने सचिन पाटील यांच्यावर चाकूने वार केले.वर्मी घाव बस त्याने सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परभणीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राजकीय पूर्व व्यवस्थातून सचिन पाटील यांचा खून झाला का याचा अंदाज आता परभणी पोलीस घेत आहेत. परभणीत घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.परभणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.