Pune Crime News : भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्यावर एमपीडीएनुसार कारवाई

एमपीसी न्यूज – भेसळयुक्त ताडीची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका सराईतावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली. अनिल व्यंकटेश भंडारी (वय २५, रा. गिरीराज चौक, पाषाण) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव असून ताडी विक्री प्रकरणात पुणे पोलीसांनी प्रथमच एमपीडीएनुसार कारवाई केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अनिल हा सराईत गुन्हेगार असून, तो पाषाण परिसरात रासायनिक भेसळयुक्त ताडी विक्रीचा व्यावसाय करत होता. त्याबाबत त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर कडक एमपीडीएनुसार कारवाई करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी प्रस्ताव तयार केला होता. तो प्रस्ताव परिमंडळ चारचे उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्फत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्तांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करत औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात पाठविले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.