Mulshi : वर्क फ्रॉम होम करणे पडले महागात

एमपीसी न्यूज – वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वेगवेगळे टास्क सांगून एका व्यक्तीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. (Mulshi) यामध्ये व्यक्तीची 17 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 30 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत मुळशी तालुक्यातील भटेवरानगर येथे घडला.

साधन रुद्रप्रताप मिश्रा (वय 36, रा. भटेवरानगर, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्लीज सर्विस कंपनीचा एचआर मॅनेजर आणि विविध बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : शहरातील बेटिंग कारवाईचा तळ पोलिसांना लागेल का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फोनवर अनोळखी व्यक्तीने फोन करून वर्क फ्रॉम होमसाठी संधी असल्याचे सांगितले. वर्क फ्रॉम होम करण्याची इच्छा फिर्यादी यांनी व्यक्त केली असता त्यांना फोनवरील आरोपींनी वेगवेगळे टास्क पाठवले. वेगवेगळे बँक खात्यांचे नंबर पाठवून वर्क फ्रॉम होमसाठी काम देण्याच्या बहाण्याने पैसे मागितले. फिर्यादी यांनी वेळोवेळी 17 लाख 25 हजार रुपये दिले. (Mulshi) पैसे दिल्यानंतर ही फिर्यादी यांना कुठल्याही प्रकारचे काम अथवा त्यांनी दिलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.