शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Mumbai News : शाळेत मास्क सक्ती नाही – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – राज्यातील शाळा येत्या १५ जूनपासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाही, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. कोरानाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता.त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने त्याबाबत आता स्पष्टीकरणच दिले आहे.

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्य सरकार कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेत आहे.पण कोरोना काळातील योग्य नियमावलींसह आम्ही १५ जूनला शाळा सुरू करणार आहोत.त्याचप्रमाणे शाळेत येताना विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक असणार नाही.त्यामुळे नव्या एसओपीज जाहीर करण्यात येतील.तसेच पुढील निर्णय हे परिस्थितीनुसार घेतले जातील.

राज्य मंडळाच्या शाळा या १३ जून रोजी तर केंद्रीय मंडळाच्या शाळा आठ जूनपासून सुरु होत आहेत.या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊनच शाळा उघडल्या जातील.विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रश्न आहे.लसीकरण वाढविण्याबाबत टास्क फोर्सचा सल्ला घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

spot_img
Latest news
Related news