Sidhu Moosewala Shooters : संतोष जाधव एक वर्षापासून पुण्यातून फरार; मंचरच्या सराईत गुन्हेगाराची केली होती हत्या

एमपीसी न्यूज : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala Shooters) याची पंजाबमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचे धागेदोरे पुण्यात सापडले आहेत. सिद्धू मूसेवाला याच्यावर ज्या आठ लोकांनी गोळ्या चालवल्या, त्यातील दोघेजण पुण्याचे आहेत, हे समोर आल्यावर पुणे पोलिसांनी त्याबाबत प्राथमिक माहिती माध्यमांना दिली आहे.

सिद्धू मूसेवाला याच्यावर आठ लोकांनी गोळ्या झाडल्या. यापैकी संतोष जाधव आणि सौरव महाकाळ हे दोघे पुण्याचे आहेत. त्यांची माहिती देताना पुणे ग्रामीण पोलिस म्हणाले, की ‘’संतोष जाधव हा गेल्या एक वर्षापासून एका केसमधील फरार आरोपी आहे. तो राजस्थान – पंजाब बॉर्डरवर पळून गेला होता. त्यानंतर तो अजूनही फरारच आहे. 302, मोक्का केसमधला वाॅन्टेड आरोपी आहे. एवढीच माहीती आमच्याकडे आहे. आम्ही त्याच्या शोधात आहोत. त्याचे फोटो देखील शेअर केले होते. तर, सौरव महाकाळ हा तळेगाव दाभाडे भागातला फरार आरोपी आहे.’’

Sidhu Moose Wala Death Update : सिद्धू मूसेवाला खून प्रकरण; 8 पैकी 2 शूटर पुण्यातले?

पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव (Sidhu Moosewala Shooters) याच्याबद्दल माहिती देताना ज्या खुनाचा उल्लेख केला आहे, तो व्यक्ती मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले होता. ओंकारला संतोषने सोशल मिडियावरच त्याच्या खुनाची कल्पना दिली होती. त्याने जाहीररीत्या ‘सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन’ अशी पोस्ट केली होती. यावर ओंकारने प्रतिउत्तर देत म्हंटले होते, की समोर भेटून मारहाण करू. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 1 ऑगस्ट रोजी बाईकवरून आलेल्या 7 जणांनी ओंकारची गोळ्या झाडून हत्या केली. त्यात मुख्य आरोपी संतोष फरार आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्र्नोई याने या हत्येची जबाबदारी उचलली आहे. परंतु, समोर आलेली नावांमधील शूटर हे पुण्यातील असल्याने खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.