Pimpri News : महिला उद्योजकांना पालिकेने गाळे द्यावेत – दुर्गा भोर

एमपीसी न्यूज – महिला उद्योजकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने गाळे उपलब्ध करून द्यावेत. उद्योजक महिलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केला.

याबाबत महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. त्यात भोर यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड महापालिका परिसरात अनेक छोटे मोठे व्यवसाय उद्योग करणाऱ्या महिलांचा मोठा समुदाय आहे. परंतु, औद्योगिकनगरीत व्यवसायांसाठी महिला उद्योजकांना जागेची कमतरता भासत आहे. रहिवाशी भागात उद्योग करण्यास थ्री फेज कनेक्शन सारख्या अनेक त्रुटी जाणवतात तसेच काम करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही.

त्यामुळे महिला उद्योग निर्मितीला आळा बसला आहे. महिला लघु उद्योजक संघटनेतर्फे लवकरच महिलांसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठे प्रोजेक्ट हातात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अनेक महिला उद्योजकांना जागेची कमतरता जाणवते. महापालिकेने याकडे लक्ष देऊन महिलांना गाळे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर महापालिका आयुक्त पाटील आणि महापौर ढोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर मागणीची पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिल्याचे भोर यांनी सांगितले. याप्रसंगी सुषमा पठारे, रश्मी ओहरी गणेश भेळ, अर्पिता चौगुलवार, सुनीता कलोला, रूपाली होनकळस, मीनाक्षी गिरी, अॅड. पद्मजा गोवित्रिकर, अर्पिता चौगुलवार महिला उद्योजिका उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.