Chakan News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; एकाला अटक

0

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाला काठीने आणि दगडाने मारून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे चाकण मधील गोसावीनगर येथील मैदानावर घडली.

गणेश बहिरू रेड्डी (वय 25, रा. बालाजीनगर, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक संतोष फुलंब्रीकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई मालिनी संतोष फुलंब्रीकर (वय 46, रा. मेदनकरवाडी, चाकण. मूळ रा. अकोला) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जखमी मुलगा अभिषेक आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी अभिषेक याला गोसावीनगर येथील मैदानावर नेले. तिथे त्याला शिवीगाळ करून लाकडी काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली.

यात अभिषेक याच्या डोक्यात, डोळ्यावर, तोंडावर गंभीर दुखापत झाली. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1
Leave a comment