Chinchwad News : ऑनलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला अन घडला विपरीत प्रकार…

0

एमपीसी न्यूज : कोरोना काळात सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी आपल्या 11 वर्षाच्या मुलीला मोबाईल फोन दिला. मुलीने शिक्षण घेता घेता भलताच प्रकार केला. एके दिवशी वडिलांनी मुलीचा मोबाईल सहज तपासला असता त्यांना धक्का बसला. मुलीच्या मोबाईल फोनमध्ये तिचाच अश्लील व्हिडीओ होता. त्यानंतर वडिलांनी मुलीशी चर्चा करून सायबर पोलिसांकडे धाव घेतली अन सत्य बाहेर आले.

वडिलांनी मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबईल फोन घेऊन दिला. तसेच तिला ई-मेल खाते देखील उघडून दिले. त्यानंतर मुलीचे शिक्षण ऑनलाईन माध्यमातून मोबाईल फोनवर सुरु झाले. मोबाईल फोनच्या माध्यमातून मुलगी शिक्षण घेत असल्याचे समजून घरचे निश्चिंत झाले. मात्र, एके दिवशी वडिलांनी सहज मुलीचा मोबाईल फोन बघितला. तिच्या मोबाईल फोनमध्ये तिचा अश्लील व्हिडीओ असल्याचे वडिलांना दिसले.

तो व्हिडीओ तिने कुणालातरी ई-मेलद्वारे पाठवला होता. त्यानंतर त्यांनी मुलीला विचारले असता तिने वडिलांना सांगितले की, तिला एका अनोळखी व्यक्तीचा मेल आला. त्यात तिचा अश्लील व्हिडीओ बनवून पाठवण्यास सांगितले होते. व्हिडीओ न पाठवल्यास घरच्यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने तिचा अश्लील व्हिडीओ बनवून पाठवला. हा प्रकार गंभीर असल्याने वडिलांनी मुलीला घेऊन पिंपरी-चिंचवड सायबर विभाग गाठला.

_MPC_DIR_MPU_II

सायबर पोलिसांनी मुलीला आलेल्या मेलची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र तो मेल मुलीने डिलीट केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिच्या मोबाईल फोनची पाहणी केली असता त्यात तिने इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर एका तरुणाशी केलेले अश्लील संभाषण समोर आले. इंस्टाग्रामवरील अश्लील संभाषण करणारे खाते जरी आपले असले तरी ते सध्या माझी बालपणीची मैत्रीण वापरत असल्याचा बनाव मुलीने केला.

या सर्व प्रकारानंतर सायबर पोलिसांना मुलीवरच संशय येऊ लागला. तरीही पोलिसांनी तिच्याकडे आणखी चौकशी करून तिने ज्या मुलासोबत संभाषण केले आहे, त्याला बोलावून घेतले. ‘मला फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती मी स्वीकारली आणि नंतर समोरच्या मुलीनेच माझ्यासोबत संभाषण करण्यास सुरुवात केली’ असल्याचे तरुणाने सांगितले. तिने स्वतःचा अश्लील व्हिडीओ तयार केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

या घटनेमुळे ऑनलाईन शिक्षण एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सध्या शहरात एक टोळी मुलींना सोशल मिडीयावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी संभाषण करून घरातील दागिने आणि पैसे आणण्यास सांगत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळे या मुलीच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांना होता. त्या अनुषंगाने तपास करण्याचा प्रयत्न केला मात्र, हा प्रकार वेगळाच असल्याने पोलिसांनी डोक्याला हात लावला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल फोन देताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत, याकडे पालकांनी लक्ष ठेवायला हवे. घरातील वस्तू गायब होत असल्यास याबाबत मुलांना विचारणा करा. किशोर वयातील मुलांना भिन्न लिंगाच्या व्यक्तीचे आकर्षण असते, त्यामुळे मुलांवर बारीक लक्ष ठेवा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment