Pimpri News : महिला बचत गटाचा सार्वजनिक शौचालय देखभालीचा नवी दिशा उपक्रम

एमपीसी न्यूज – लोक सहभागातून परिसर व शहर स्वच्छता राखल्यास पिंपरी-चिंचवड स्वच्छ व सुंदर शहर म्हणून अग्रेसर होईल. त्यामध्ये महिलांचा सहभाग हा महत्व पूर्ण असल्याचे व झोपड पट्टीतील सार्वजनिक शौचालय देखभालीचा नवी दिशा हा महिला बचत गटाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केले.

नवी दिशा उपक्रम राबवण्यात येत असून ‘क’ प्रभागातील गवळी माथा झोपडपट्टीतील शौचालय जिजाऊ महिला बचत गट यांना देखभाल करण्यासाठी सुपूर्त करण्यात आले. ‘क’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गवळी माथा येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व देखभालचे कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते जिजाऊ महिला बचत गटाकडे सोपवण्यात आले.

Andhar Savalicha Song : अभिनेत्री उर्मिला जगतापचं ‘अंधार सावलीचा’ गाणं प्रदर्शित

उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्यअधिकारी बी. बी. कांबळे, कार्यकारी अभियंता रामुगुडे , उपअभियंता  सुनील हरिदास  मुख्यआरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, मनपा कर्मचारी आणि जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर , गवळीनगर पतसंस्थेचे रामदास आदक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.