India Corona Update : नवा उच्चांक ! गेल्या 24 तासांत 39,726 नवे कोरोना रुग्ण

देशातील एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 15 लाखांच्या पुढे 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 39 हजार 726 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. 2021 वर्षातील ही उच्चांकी रुग्ण वाढ आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांत नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 10 लाख 83 हजार 679 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 20 हजार 654 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 13 लाख 70 हजार 546 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 57 हजार 383 चाचण्या गुरुवारी (दि.18) करण्यात आल्या आहेत.

सध्या देशात 2 लाख 71 हजार 282 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशात 154 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 370 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा आहे‌. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.25 टक्के एवढं झाले आहे.

कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी 93 लाख 39 हजार 817 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.