Nigdi Burglary : प्राधिकरणात भर दिवसा घरफोडी; सव्वापाच लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण (Nigdi Burglary) येथे भर दिवसा घरफोडी झाली. त्यात अज्ञात चोरट्यांनी पाच लाख 20 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 24 मे) दुपारी सव्वाबारा ते पावणे दोन वाजताच्या कालावधीत घडली.

नबील हानान सय्यद (वय 39, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MSEB : एमएसईबी मधून बोलत असल्याचे भासवून ऑनलाइन चार लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता फिर्यादी यांची आई घराला कुलूप लावून दवाखान्यात गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा पाठीमागील बाजूचा सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख 20 हजार 150 रुपये किमतीचे 127 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले. निगडी पोलीस (Nigdi Burglary) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.