Pimpri News : पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नितीन गट्टानी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड प्लास्टिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नितीन गट्टानी तर उपाध्यक्षपदी संदीप लखानी यांची निवड झाली. पिंपरी – चिंचवड प्लास्टिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 27) चिंचवड येथे पार पडली. यावेळी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दरम्यान, पॉलिमर आयकॉन पुरस्कारांचे वितरण सु्द्धा करण्यात आले.

कार्यक्रमासाठी पॉलिमर उद्योगातील मधुकर बाबर, अनिल भांगडीया, बाबुराम जी गर्ग, सदाशिव बोराटे, शिवाजी दराडे, प्रदीप बुद्रुक, अनिल नाईक, राम मिरजे, गोपाल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे सचिव म्हणून रोहित बोरा आणि खजिनदार म्हणून कन्हैया खत्री यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमात पॉलिमर आयकॉन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पॉलिमर आयकॉन पुरस्कार प्राप्त उद्योजकांची नावे – 

  • इमर्जिंग पॉलिमर कंपनी ऑफ द इअर – यश प्लास्ट्रोटेक (सुनील गोसावी)
  • इनोव्हेटिव्ह कंपनी ऑफ द इअर – प्रसाद मेडीटेक (शिवाजी दराडे)
  • पॉलिमर कंपनी ऑफ द इअर मोलडिंग – एलिट ग्रुप (सदाशिव बोराटे)
  • पॉलिमर कंपनी ऑफ द इअर डाइज ॲन्ड मोल्ड – क्रिएटिव्ह काम्पोन्टस् (रवी हिरेमठ)
  • जीवन गौरव पुरस्कार – दिवंगत राजीव जोशी (प्राईमा पेपर)

कार्यक्रम प्रसंगी चार्टर्ड अकाऊंटंट निखिल इनानी यांनी जीएसटी कायद्यातील बारकाव्यांबद्दल माहिती दिली. ‘व्यवसाय करताना कर भरणे आवश्यक आहेच, पण त्यासोबतच वेळीच सर्व कर भरणे देखील गरजेचे आहे. अन्यथा काही काळानंतर करांमध्ये लक्षणीय वाढ होते. व्यावसायिकांनी कराबाबत सर्व लहानसहान गोष्टींची काळजी घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन गर्ग यांनी केले आणि आभार पंकज गर्ग यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.