Pune News : डेक्कन येथे हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत अश्लील कृत्य, वाचा काय घडलं? 

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब यांनी हेअरकट करताना एका महिलेच्या केसात थुंकल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्याच्या डेक्कन परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

डेक्कन येथील एका प्रसिद्ध हेअर स्पा मध्ये एक तरुणी आली होती. यावेळी या कर्मचाऱ्यांनी तिच्या सोबत अश्लील कृत्य केल्याचे उघडकीस आले. याबाबत हडपसर येथील तरुणीने डेक्कन पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ही तरुणी हेअर स्पा करण्यासाठी डेक्कन येथील हेअर आर्ट येथे आली होती. त्याठिकाणी असलेला कर्मचारी मंदार साळुंके हा तिचे हेअर स्पा करीत होता. हेअर स्पा करत असताना तो तिच्या मानेचा मसाज करीत होता.

त्यासाठी तिने मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी तरुणीच्या ओठांचा किस घेतला. अंगाला जाणीवपूर्वक अश्लील वर्तन करत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.