Pune News : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश बंदी

एमपीसी न्यूज : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यभरात निर्बंधही घातले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

त्यानुसार पुण्याजवळील सिंहगडावरही नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांना गडावरील प्रवेश बंद राहील असे पुणे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

सिंहगड किल्ला हा पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला किल्ला आहे. शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे वन विभागाने हा किल्ला पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे नागरिकांनी किल्ल्याच्या पायथ्याशी गर्दी करू नये आणि शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी किल्ल्यावर जाण्याचा बेत करू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.